इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू: तृप्ती देसाई.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसनं केली असतानाच, आता भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास, इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला आहे.