हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या, मोहिम्या आखल्या, अनेक परकीय आक्रमणे चतुराई आणि शौर्याने परतवून लावली. अशाच मोहिमेवर असताना एका वृद्ध महिलेच्या दोन वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे खाडकन उघडले. त्या वृद्ध महिलेच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी मोठा पराक्रम गाजवला. नेमके काय घडले, जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर गेले होते. मात्र, अपेक्षित यश त्यांना मिळत नव्हते. दोन दिवसानंतर शिवाजी महाराज परत फिरले. शिवाजी महाराज परतत असताना, त्यांना वाटेत घनदाट जंगल लागले आणि महाराज रस्ता चुकले. जंगलातून मार्ग काढताना एका वृद्ध महिलेच्या झोपडीपाशी येऊन थांबले. दिवसभर उपास घडल्याने महाराजांना भरपूर भूक लागली होती. न राहून महाराजांनी त्या वृद्ध महिलेला भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. वृद्ध महिलेकडे अन्नधान्याची वानवा होती. तरीही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून त्यांनी महाराजांना आणि मावळ्यांना मऊसर भात वाढला.