करोनाचं महाभयंकर संकट रोखण्यासाठी राज्य सरकारनं मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली. नववी व अकरावीचे उर्वरित पेपर १५ एप्रिलनंतर होणार आहेत. दहावीचे उरलेले पेपर मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असं गायकवाड यांनी सांगितलं. दहावीचे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांनी घरूनच काम करावे, अशा सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत.