हा आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा डाव; काँग्रेसला संशय.

पुण्यातील एल्गार परिषद चौकशीच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची साथ मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना,' अशी भीती महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.