समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह सध्या आजारपणामुळे कठिण परिस्थितीचा सामना करत आहेत. आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मंगळवारी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटद्वारे त्यांनी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक भावूक ट्विट केलंय. या ट्विटद्वारे अमर सिंह यांनी बीग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
'आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचं भलं करो' असं ट्विट अमर सिंह यांनी केलंय.
मृत्युशी झगडताना अमर सिंह यांचं बीग बींसाठी भावूक ट्विट.