मुख्यमंत्र्यांचं हृदयाचं ऑपरेशन; तरीही सेनापतीप्रमाणे लढताहेत: आव्हाड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे अशा व्यक्तिंना ताण-तणावापासून दूर राह्यला सांगितलं जातं. मात्र आज राज्यात युद्धाची परिस्थिती असताना उद्धव ठाकरे एखाद्या सेनापतीप्रमाणे धीरोदत्तपणे लढत आहेत. महाराष्ट्राला धीर देत आहेत, अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हृदयाची काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. ती कशा प्रकारची होते हे मी सांगू इच्छित नाही. पण अशा व्यक्तिने ताण-तणावापासून लांब राहिलं पाहिजे, असं सांगितलं जातं. पण आज युद्धाची परिस्थिती असताना या युद्धाला ते धीरोदत्त सेनापती सारखे सामोरे जात आहेत. महाराष्ट्राला धीर देत आहेत. मला त्यांचा अभिमान आहे, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.